भिल्लवाडी ग्रुपच्यावतीने १ जानेवारी रोजी खुल्या रस्सीखेचं स्पर्धेचं आयोजन

सावंतवाडी । प्रतिनिधी :

भिल्लवाडी ग्रुप मळगावच्यावतीने भव्य दिव्य अशी खुल्या रस्सीखेचं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा १ जानेवारी २०२३ रोजी ४ वाजता आझाद मैदान मळगाव येथे घेण्यात येणार आहे.

यात खुल्या पुरुष गटासाठी प्रथम पारितोषिक २११११ रुपये, द्वितीय पारितोषिक १५१११ रुपये, आणि तृतीय पारितोषिक ५१११ रुपये तसेच प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

खुल्या पुरुष गटातील बेस्ट फ्रंट मॅन २१११ आणि बेस्ट लास्ट मॅन २१११ तसेच प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी इच्छुक संघाने अधिक माहितीसाठी भिल्लवाडी ग्रुपचे सदस्य पांडुरंग ९६१९२०२६८७, दिपेश ८९७५८४४९८९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Sindhudurg