पेटता दिवा कपड्याला लागून युवती गंभीररित्या भाजली ; सोनुर्लीतील घटना

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । प्रतिनिधी : सकाळच्यावेळी न्हाणी घरात चूल पेटवण्यासाठी पेटता दिवा घेऊन जातांना कपड्याला आग लागून सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील लीला कमळाजी नाईक (२५) ही युवती गंभीररित्या जखमी झाली. तिच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन अधिक उपचाराकरिता तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, लीला ही थोडीशी मतिमंद असून ती गुरुवारी सकाळी न्हाणीत आग पेटविण्यासाठी पेटता दिवा घेऊन जात होती. यावेळी तिच्या गाऊनला आग लागुन ती जवळपास सत्तर टक्के भाजली. यावेळी घरात अन्य कोणीच नव्हते. आई वडील नजिकच्या शेतात गेल्याने हा प्रकार उशिराने निदर्शनास आला.
त्यानंतर तिला त्वरीत उपचारार्थ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ती गंभीर जखमी असल्याने तिला प्राथमिक उपचार करुन अधिक उपचाराकरिता ओरोस जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. याबाबत येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

The young woman was severely burned when the burning lamp touched her clothes