प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतील वारसास जिल्हा बँकेतर्फे दोन लाखांचे विमा सुपूर्द

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । प्रतिनिधी : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्यावतीने राबवली जाते. या योजनेंतर्गत कुत्रा चावल्याने मृत्यू झालेल्या आरोंदा येथील मिलिंद निळकंठ पावसकर यांच्या वारस पत्नी मनाली मिलिंद पावसकर यांना दोन लाख रक्कमेचे विमा पत्र देण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा बँक आरोंदा शाखेच्या शाखा व्यवस्थापक स्मिता नारायण शेणवी केरकर यांच्या हस्ते हे पत्र त्यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी अन्य बँक कर्मचारी उपस्थित होते.

सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा गावातील मिलींद निळकंठ पावसकर यांचे कुत्रा चावल्यामुळे निधन झाले होते. त्यांच्या नावे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा उतरविण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी मनाली यांना जिल्हा बँक आरोंदा शाखेच्य माध्यमातून दोन लाख रुपये रक्कमेचे विमा पत्र सुपूर्द करण्यात आले.

Sindhudurg