फुकेरी हनुमंत गडाच्या संवर्धनानिमित्त यात्रेचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी : दोडामार्ग तालुक्यातील
फुकेरी येथील हनुमंत गडाच्या संवर्धनासाठी
सह्याद्री प्रतिष्ठान व देवी माऊली कला क्रीडा मंडळ फुकेरी यांच्यावतीने शिवरथ यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेचे सावंतवाडीत जंगी स्वागत करण्यात आले. दोडामार्ग येथून बांदामार्गे माजगाव सावंतवाडी अशी ही शिवरथ यात्रा काढण्यातआली. सावंतवाडी संस्थानच्या राजवाड्यात तसेच वटसावित्रीमंडळ व बाजारपेठ यासह शहरात ठिक ठिकाणी या यात्रेचे स्वागत करण्यात आले. हनुमंतगडाच्या संवर्धनासाठी सावंतवाडीकरांचा संपूर्ण सहभाग असेल, असा विश्वास यावेळी सावंतवाडीकर बांधवांनी व्यक्त केला.
शिवरथयात्रा वाजत गाजत सावंतवाडी शहरात दाखल झाली. यावेळी सावंतवाडी संस्थानच्या राजवाड्यात युवराज लखमराजे सावंत भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे यांनी यात्रेचे स्वागत केले. तेथून सावंतवाडी खासकिलवाडा शाळा नंबर ४ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवरथ यात्रा माजी नगरसेवक सुधन्वा आरेकर व मराठा समाज उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष संजू परब यांच्या निवासस्थानाकडे आल्यावर फटाके वाजवून व सुहासिनींनी ओवाळून जंगी स्वागत केले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माजी नगरसेवक तथा मराठा समाजाचे पदाधिकारी सुधन्वा आरेकर व आदित्य आरेकर यांनी भव्य पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रेमानंद देसाई, सुमंगल आरेकर, मराठा समाज उत्कर्ष मंडळाच्या महिला तालुकाध्यक्षा सौ. संजना परब सौ. आर्वी आरेकर, अजित सावंत, सीमा राठोड, जयश्री बिर्जे, साक्षी दळवी, साधना शिर्के, कमलेश उर्फ बंड्या आरेकर, ज्योती तांबे, राजेंद्र मोरजकर, मराठा समाज उत्कर्ष मंडळाचे सचिव ॲड. संतोष सावंत, सहसचिव विनोद सावंत, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, संतोष मुळीक
आदी उपस्थित होते.
त्यानंतर पोलीस लाई च्या मार्गावर माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, मिलिंद देसाई अखिल केसरकर, अमय मोरे यांनी यात्रेचे स्वागत केले .सावंतवाडी बाजारपेठेत रिक्षा चालक-मालक व्यापारी आणि मराठी बांधवांनी व शिवभक्तांनी तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालय निवासस्थानीही उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यात्रेचे जंगी स्वागत केले. त्यानंतर ही यात्रा कुडाळ येथे निघाली.
फोटो – फुकेरी येथील हनुमंत गड संवर्धनासाठी काढण्यात आलेल्या शिवरथ यात्रेचे शिवप्रतिमेला पुष्पहार घालून स्वागत करताना माजी नगरसेवक सुधन्वा आरेकर व आदित्य आरेकर सोबत मराठा समाज उत्कर्ष मंडळाच्या महिला तालुकाध्यक्षा सौ. संजना परब, सुमंगल आरेकर, आर्वी आरेकर, कुमारी परब आदी ( जतिन भिसे )
Sindhudurg