सिंधुनगरी | प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालाय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय, सिंधुदुर्ग द्वारा आयोजित जिल्हास्तरीय स्क्वॅश स्पर्धा क्रीडा संकुल ओरोस येथे नुकतीच पार पडली. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी श्रीम. विद्या शिरस, जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग, श्री. विजय शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी, सिंधदुर्ग, श्री. श्याम देशपांडे, तालुका क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग व श्रीम. मनिषा पाटील, तालुका क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग व जिल्हा स्क्वॅश असोसिएशन सिंधुदुर्ग चे अध्यक्ष अॅड. विवेक राणे यांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेसाठी पंच म्हणून अॅड. विवेक राणे, कु. जीशिना नायर व कु. चित्राक्षा मुळये यांनी काम पहिले. या स्पर्धांमध्ये जिल्हातील विविध शाळा व कॉलेजने सहभाग घेतला, त्यामध्ये जिल्ह्यातील खालील विजेत्या सर्व खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
१४ वर्षाखालील मुलांमध्ये (शिवाजी इंग्लिश स्कूल, पणदूर तिठा)चे खेळाडू कु. काव्य दळवी याचा प्रथम व कु. श्रीकृष्ण भोई याने द्वितीय क्रमांक पटकावला.
१४ वर्षाखालील मुलींमध्ये (बाल शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल, कणकवली) ची खेळाडू कु. ऋचा प्रधान हिचा प्रथम क्रमांक व (सेंट फ्रान्सिस झेवियर इंग्लिश मिडियम स्कूल, आजगाव) च्या खेळाडू कु. सिमरन फर्नांडिस हिला द्वितीय, कु. ऋतुजा परिपत्ते हिला तृतीय, कु.गायत्री दाभोलकर हिला चतुर्थ व कु. अदिती सूर्याजी हिला पाचवा क्रमांक प्राप्त झाला.
१७ वर्षाखालील मुलांमध्ये कु. कुणाल नारकर (बाल शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल, कणकवली) याला प्रथम, कु.नितेश गुप्ता (न्यू इंग्लिश स्कूल, ओरोस) याला द्वितीय, कु.सोहम महेंद्रकर (आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल, वरवडे) याला तृतीय, कु. अथर्व भोगटे (कासार्डे विद्यालय ) याला चतुर्थ व सुरज काळे (न्यू इंग्लिश स्कूल, ओरोस) याला पाचवा क्रमांक प्राप्त झाला.
१७ वर्षाखालील मुलींमध्ये कु. श्रद्धा तेली (कासार्डे विद्यालय ) हिला प्रथम, कु. सोनिया ढेकणे (बाल शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल, कणकवली) हिला द्वितीय, कु. आयुष्या सावंत (बाल शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल, कणकवली) हिला तृतीय, कु. अनुष्का चव्हाण (कासार्डे विद्यालय) हिला चतुर्थ
व कु. माही नयानी (बाल शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल, कणकवली) हिला पाचवा क्रमांक प्राप्त झाला.
१९ वर्षाखालील मुलांमध्ये कु. प्रथमेश राणे (दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पणदूर तिठा) याला प्रथम क्रमांक व कु. समीर जाधव याला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. तसेच कु. वेदांत राणे (कासार्डे विद्यालय ) याला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
१९ वर्षाखालील मुलींमध्ये कु. तन्मयी भगत (न्यू इंग्लिश स्कूल अॅण्ड ज्यूनि. कॉलेज, कसाल ) हिला प्रथम व कु. वैष्णवी गायकवाड (कासार्डे विद्यालय) हिला द्वितीय तर कोमल पाताडे हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
वरील सर्व खेळाडूंची सांगली येथे होणाऱ्या विभाग स्तरीय स्क्वॅश स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सिंधदुर्ग जिल्हा स्क्वॅश असोसिएशन, सिंधुदुर्गचे अध्यक्ष अॅड. विवेक राणे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.