केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांचे खाजगी स्वीय सहाय्यक संदीप भोसले यांच्या मातोश्रींचे निधन

कणकवली | प्रतिनिधी : कणकवली शहरातील बिजलीनगर महायज्ञ कॉम्प्लेक्स येथील श्रीमती मंदा मधुकर भोसले वय ८० यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. शुक्रवार २३ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता ही दुःखद घटना घडली. मंदा भोसले यांच्यावर कणकवली येथील स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात विवाहित मुलगी, एक मुलगा सुना नातवंडे असा परिवार आहे. केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांचे खाजगी स्वीय सहाय्यक संदीप भोसले यांच्या त्या मातोश्री होत.