फोंडाघाटच्या नूतन सरपंच सौ. संजना संजय आग्रे यांचे बाळासाहेबांची शिवसेना महिला पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार

कणकवली | प्रतिनिधी : फोंडाघाट सरपंचपदी निवडून आलेल्या सौ. संजना संजय आग्रे यांचा बाळासाहेबांची शिवसेना महिला पदाधिकारी यांच्या यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील राजकिय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. फोंडाघाट येथील ग्रामस्थांनी विश्वास टाकून आपल्यासह आपल्या सहकाऱ्यांना निवडून दिल्याने आता आमची जबाबदारी वाढली आहे. यापुढे गावचा विकास डोळ्यासमोर ठेवून पुढील प्रवास राहील, असा शब्द सौ.आग्रे यांनी दिला. बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या निवासस्थानी हा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय आग्रे, ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हा निरीक्षक समीक्षा दळवी, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, महिला उपजिल्हाप्रमुख सौ संजना हळदिवे, महिला उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, कुडाळ महिला उप तालुकाप्रमुख अनघा रांगणेकर, जयदीप तुळसकर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.