‘हरवलेली कविता’ काव्यसंग्रहाचे एडगाव येथे सोमवारी प्रकाशन

वैभववाडी | प्रतिनिधी : तालुक्यातील एडगावचे सुपुत्र राजेंद्र अर्जुन पवार रचित ‘हरवलेली कविता’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोमवार दि.२६ रोजी सायंकाळी ५.३० वा. करण्यात येणार आहे. हा प्रकाशन सोहळा एडगाव पवारवाडी येथील श्री खेंडोबा मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. श्रमश्रेम प्रकाशन ही ‘हरवलेली कविता’ या काव्यसंग्रहाची प्रकाशन संस्था आहे. यावेळी संत निरंकारी आध्यात्मिक सत्संग समारंभ प. पू. अरुण पाटील (ज्ञानप्रचारक, मुंबई) यांच्या उपस्थितीत आध्यात्मिक सत्संग समारंभ होणार आहे.

काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यासाठी प्रसिध्द मालवणी कवी प्रा. डॉ. नामदेव गवळी, पोलिस निरिक्षक अमित यादव, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, तालुका संघाचे अध्यक्ष तथा माजी सरपंच प्रमोद रावराणे, वैभववाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीधर ऊर्फ मनोज साळुंखे, , जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव महेश रावराणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रकाश काळे, पवारवाडी उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष प्रमोद पवार आदी प्रमुख निमंत्रित पाहुणे आहेत.काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याचे निवेदन लेखक व कवी चेतन बोडेकर करणार आहेत. या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याला विद्यार्थी, साहित्यिक, काव्यप्रेमी व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पवारवाडी उत्कर्ष मंडळातर्फे करण्यात आले आहे.