सिंधुनगरी | प्रतिनिधी
ओरोस येथे स्थायिक झालेले शिवा नारायण कानडे वय 85 यांचे गुरुवारी रात्री अल्पशा आजसरामुळे दु:खद निधन झाले. कानडे गुरुजी या नावाने त्यांना ओळखले जात होते. येथील यशस्वी व्यावसाईक श्री बाळू कानडे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा सुन विवाहीत मुली जावई नातवंडे असा मोठा परीवार आहे. त्यांचे मुळगाव हेदूळ ता मालवण हे आहे.
कानडे गुरुजी यांनी या परिसरातील अनेक प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम केले होते. त्यामुळे त्यांचा फार मोठा विद्यार्थी वर्ग त्यांचे चहाते होते. कडक शिस्तीमुळे त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले होते. अनेकांना त्यांनी चांगले मार्गदर्शनही केले होते. गेले वर्षभर ते आजारी होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच ओरोस सिंधुनगरी सुकळवाड या परिसरात शोककळा पसरली. त्यांच्यावर शुक्रवारी येथिल स्मशानभूमित अत्यसंसंकार करण्यात आले.
सुकळवाड येथिल शिक्षिका सौ विद्या कराळे यांचे ते वडील व एल आय सी चे विमा प्रतिनिधी भाई कराळे यांचे ते जावई होते. ओरोस सिंधुनगरी कसाल सुकळवाड हेदूळ रानबसंबुळी अणाव या परिसरातील नागरिकांनी त्यांच्या अंत्ययात्रेत सहभाग घेतला.