सावंतवाडी । प्रतिनिधी : उच्च माध्यमिक गटासाठी घेण्यात आलेल्या जिल्ह्यास्तरीय निंबध स्पर्धेचे बक्षिस वितरण नुकतेच अणाव येथील आनंदाश्रयात मान्यवराच्या हस्ते संपन्न करण्यात आले. या निबंध स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेची उच्च माध्यमिक विभागाची वाणिज्य शाखेची कु.गौरवी गणपत खोत हिला जिल्हास्तरीय निंबध स्पर्धेत दुसरा क्रमांक प्राप्त झाला. सदर स्पर्धा पंचशील ट्रस्ट च्या वतीने विद्यार्थ्यांना व्यक्त होता यावे या उद्देशाने घेतली होती.
या स्पर्धेसाठी कु.गौरवी खोत हिला मराठी अध्यापक प्रा.वैभव खानोलकर यानी मार्गदर्शन केले.
या निंबध स्पर्धेच्या यशाबद्दल या विद्यालयाच्या प्राचार्या सन्मा.कल्पना बोवलेकर यांनी गौरवी खोत आणि मार्गदर्शक शिक्षक प्रा.खानोलकर यांचे अभिनंदन केले असुन या यशाबद्दल या संस्थेचे अध्यक्ष श्री.राऊळ सर आणि संस्था पदाधीकारी यांनी ही अभिनंदन केले आहे. या यशा बद्दल गौरवीचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.