आंबोली सैनिक स्कूलचा १९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

ब्रि. सुधीर सावंत व प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा सत्कार
‘वेध’ या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन

आंबोली । प्रतिनिधी : आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचा १९ वा वर्धापन दिन दिनांक २२ व २३ डिसेंबर रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर प्रांताधिकारी यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाला. तर २३ डिसेंबर रोजी शाळेचे पॅट्रॉन मा. ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून वर्धापन दिनाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सांस्कृतिक व बक्षिस वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सैनिक स्कूलचे प्राचार्य सुरेश गावडे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी वर्षभरात शाळेने राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.

त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात स्वागतगीताने झाली. विद्यार्थ्यांनी मुकनाटय, लावणी, देशभक्तीपरगीत सादर केले तसेच मराठी आणि हिंदी गीतांवर विविध नृत्यप्रकार सादर केले. कॅडेट यश धुरी याच्या लावणी नृत्याने सर्वांची मने जिंकली.वर्षभरात जिल्हा व शालेय व विभाग स्तरावर क्रिडाप्रकारात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध शैक्षणिक उपक्रमामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. वर्षभरात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मच्याऱ्यांना शाळेचे स्मृतिचिन्ह देवून प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.यामध्ये बेस्ट टिचर हाषिकेश गावडे, भुषण पाटकर, अरूण गावडे, श्री सतिश आइर, रूपेश आइर यांचा सत्कार करण्यात आले. डॉ. चंद्रकांत सावंत यांचा सत्कार करण्यात आला. मागील दोन वर्षाच्या काळात कोविडसारखा आजार पसरत असताना संस्थेने सुयोग्य पध्दतीने शाळेच्या कामाचे नियोजन करून शैक्षणिक कामकाज पूर्ण केले व एकही कर्मचारी अथवा विद्यार्थी कोरोना बाधित झाला नाही, याची खबरदारी घेतली. याबाबतीत संस्थेचे व मुलांचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी २३ डिसें रोजी सकाळी ११ वाजता ब्रिगेडिअर सुधीर सावंत तसेच पी.एफ. डॉन्टस व संचालक यांचे सैनिक स्कूलच्या आवारात आगमन झाले. सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कोलाजच्या माध्यमातून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती प्रमूख पाहूण्यांना करून दिली. त्यानंतर प्रमूख पाहूण्यांचे आगमन सैनिक स्कूलच्या संचलन मैदानावर झाले. विद्यार्थ्यांनी मान्यवरांना मानवंदना देवून उत्कृष्ट सैनिकी संचलन सादर केले. १२ वी च्या विद्यार्थ्यांची पासिंग आउट परेड झाली. त्यानंतर छोटया सैनिकांनी कराटे, मल्लखांब, लेझिम, लाटीकाटी, व्हॅलीक्रॉसिंग व आबस्टॅकल्स इ. विविध मैदानी साहसी प्रात्यक्षिके सादर केली. ब्रिगेडिअर सुधीर सावंत व मा. श्री. पी. एफ. डॉन्टस संस्था अध्यक्ष यांचे शाळेचे प्राचार्य सुरेश गावडे यांनी हस्ते पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. शाळेचा वार्षिक विशेषांक ‘वेध’ चे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बेस्ट हाउस ऑफ द इयर म्हणून विशालगड हाउसची निवड करण्यात आली. तसेच बेस्ट कॅडेट म्हणून कॅडेट सुजल संतोष साटेलकर व बेस्ट स्पोर्टस्मन म्हणून कॅडेट अभिषेक उदय पाटील याचा गौरव करण्यात आला.

यावेळी ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांचे कौतूक केले. दिवसभर ज्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली ते निश्चितच कौतूकास पात्र आहेत. यासाठी विद्यार्थी व शिक्षकांनी प्रशिक्षकांनी किती परिश्रम घेतले असतील याची प्रचीती येते. या शाळेने आपला विद्यार्थी सर्वगुणसंपन्न करण्याचा संकल्प केलेला आहे, असे दिसून येते. अल्पावधित या शाळेने उंच झेप घेतली आहे, याचा शाळेतील विद्यार्थी व पालकांना अभिमान असायला हवा. एन. डी. ए. परिक्षेत अधीकाधिक विद्यार्थी उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी संबधित शिक्षक आणि पालकवर्ग या सर्वांचे योगदान असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात सैनिक स्कूलचे संस्था अध्यक्ष पी.एफ. डॉन्टस म्हणाले, जास्तीतजास्त मूलांचे भवितव्य घडविण्याचे महान कार्य या सैनिक स्कूलच्या माध्यमातून होत आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या सैनिक स्कूलचा विद्यार्थी चमकदार कामगिरी करत आहे याचा सार्थ अभिमान विद्यार्थी व पालकांना असायला हवा. १० वी १२ वी च्या शालान्त प्रमाणपत्रापरिक्षेमध्ये सैनिक स्कूलचा निकाल १०० टक्के लागतो. याचे श्रेय येथील सर्व शिक्षकांना जाते. या शाळेमधून देशसेवेसाठी मोठयाप्रमाणात सैन्यअधिकारी होण्यासाठी एन.डी.ए परिक्षेत अधिकाधीक विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविणे अपेक्षित आहे, त्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले पाहिजेत, असे स्पष्ट केले.

आभार प्रदर्शन प्राचार्य सुरेश गावडे यांनी केलेल्या कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष मा. श्री. पी. एफ.डॉन्टस सचिव श्री सुनिल राउळ उपाध्यक्ष श्री. दिनानाथ सावंत, संचालक श्री जॉय डान्टस, श्री शंकर गावडे, श्री शिवाजी परब, श्री विनायक शेणई, श्री राजाराम वळंजू, कार्यालयीन सचिव श्री दिपक राउळ, कर्नल विजय सावंत, कॅप्टन. डि. के. मोरे, श्रीम. चित्रा दिघे (अधिक्षक भ.नि.नि.वेतनपथक, माध्य. शिक्षण) सैनिक ना. पत. संस्थेचे चेअरमन श्री. शिवराम जोशी संचालक श्री चंद्रकांत शिरसाट, श्री. बाबुराव कविटकर, सौ.ललिता भोळे, आंबोली संरपंच श्रीम. पालयेकर, श्री विजय नार्वेकर,पालक प्रतिनिधी श्रीम. समजिसकर, श्रीम. गंधाली मुंडले, श्रीम. आष्टेकर, प्राचार्य गुरूदास कुसगावकर, प्राचार्य प्रदिप शिंदे, श्री सराफदार, श्री गोंविंद मोर्ये, श्री श्रीधर गावडे प्रमुख गावकर, पत्रकार श्री विजय राउत, श्री अनिल चव्हाण, सर्व शिक्षक, आंबोली ग्रामस्थ, पालक पंचकोशीतील आजीमाजी सैनिक बांधव व माजी विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.