मालवण कुडाळ मतदारसंघात निलेश राणेंचेच वादळ…

ग्रामपंचायत निवडणुकांतील मोठे यश २०२४ च्या विजयाची नांदी

माजी सभापती अजिंक्य पाताडे यांनी व्यक्त केला विश्वास

मालवण | प्रतिनिधी : सुकळवाड ग्रामपंचायत मध्ये बहुमताने भाजप विराजमान झाल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार. तसेच मालवण तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत सेने कडून भाजपकडे खेचून आणण्यात माजी खासदार निलेशजी राणे यांचा मोठा वाटा असल्याने २०२४ च्या आमदारकीची ही नांदी ठरेल आणि निलेशजी राणे आमदार होतील. असा विश्वास माजी सभापती अजिंक्य पाताडे यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ मालवण तालुक्यात आपले वादळ निर्माण केले असून समाजहिताची कामे करत तसेच कार्यकर्त्यांना आधार देऊन जनतेची कामे तात्काळ मार्गी लावत असून तरुणाई मध्ये निलेशजी राणे यांची मोठी क्रेज पाहायला मिळत आहे.

आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणूका पाहता प्रत्येक वेळी निलेशजी राणे यांनी योग्य समन्वय तसेच रणनीती आखून विजय संपादन केला.आजच्या घडीला तर कुडाळ मालवण दोन्ही तालुक्यात ७० टक्के ग्रामपंचायत भाजपच्या अधिपत्याखाली आणण्यामध्ये निलेशजी राणे यांचा करिष्मा आहे. निलेशजी राणे यांची वाढत जाणारी लोकप्रियता पाहता येणाऱ्या सर्व निवडणुका तसेच २०२४ ची आमदारकी मोठ्या मताधिक्याने निलेशजी राणे विजयी होतील. असा विश्वास अजिंक्य पाताडे यांनी व्यक्त केला आहे.