कोकणभूमी कृती समितीची गुरुवारी कोकण रेल्वे भरती अधिकाऱ्यांशी होणार महत्वाची बैठक

रत्नागिरी । प्रतिनिधी : कोकण रेल्वे मध्ये कामगारांची आवश्यकता असतानाही कोकण रेल्वे कामगार भरती करत नाहीत, प्रकल्पग्रस्तांना सेवेत रुजू करून घ्या अशी कोकण रेल्वे कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीची सातत्याने मागणी असतानाही त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीने येत्या २९ डिसेम्बररोजी कोकण रेल्वेच्या भरती प्रक्रिया अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी बेलापूर येथील कोकण रेल्वेच्या मुख्य धडकणार असल्याचे पत्र रेल्वे प्रशासनाला दिले होते. त्याची दखल घेऊन गुरुवारीच प्रकल्पग्रस्तांची रत्नागिरी कार्यालयात रेल्वेच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीमध्ये संघटनेच्यावतीने भरती प्रक्रिया अधिकारी कोकण रेल्वे यांच्याशी चर्चा केली जाणार आहे यावेळेला कोकण रेल्वे दिल भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून प्रकल्पग्रस्तांना त्यामध्ये सामावून घ्यावे अशी मागणी प्रामुख्यानं केली जाणार आहे कोकणातील तीनही जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येऊन कोकण रेल्वे अधिकारी आणि भरती प्रक्रिया अधिकारी यांच्याकडे वारंवार प्रकल्पग्रस्तांना कोकण रेल्वेच्या भरती मध्ये प्राधान्य द्यावे याबाबत निवेदन दिला आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाकडे कोकण रेल्वे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केला आहे. कोकणातील आमदार, खासदार यांना निवेदन देऊन सुद्धा त्यांनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. कोकण रेल्वे होत असताना इथल्या भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी कोकण रेल्वेला कवडीमोल दराने जमिनी दिल्या. मात्र त्यानंतर या प्रकल्पग्रस्तांची कोकण रेल्वे प्रशासनाने फसवणूक केली आहे अशी भूमिका कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने मांडण्यात आली आहे. सध्या कोकण रेल्वेला मनुष्यबळाची गरज असताना सुद्धा कोकण रेल्वे ठेकेदार पद्धतीने कामगार भरती करत आहे. ठेकेदारी पद्धती ऎवजी प्रकल्पग्रस्तांना भरती प्रक्रियेमध्ये थेट सामावुन घ्यावं अशी वारंवार मागणी संघटनेच्या वतीने केली जात आहे. लोटे चिपळूण येथे रेल्वे कारखाना होत आहे तिथेही प्रकल्पग्रस्तांना सेवेत रुजू करण्यात यावं अशी मागणी आज पर्यंत कोकण रेल्वे अधिकारी आणि भरती प्रक्रिया अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. मात्र त्याकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालढकल केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे भरती प्रक्रिया अधिकारी यांच्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे वय वाढत आहेत.

याबाबतच कोकण रेल्वेला जाग आणण्यासाठी कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांनी भरती प्रक्रिया अधिकाऱ्यांची भेट मागितली होती. गुरुवारी 29 डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कोकण रेल्वे बेलापूर ऑफिसमध्ये आम्ही धडकणार असल्याचे आशयाचे पत्र कृती समितीच्या वतीने देण्यात आलं होतं. या पत्राची दखल घेऊन प्रकल्पग्रस्तांची रत्नागिरी मिरजोळे येथे कोकण रेल्वेच्या मुख्य कार्यालयात सकाळी १० वाजता भरती प्रक्रिया अधिकारी यांच्यासमवेत बैठक होणार आहे. या बैठकीला प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृति समितीच्यावतीने करण्यात आले आहे.