एका चांगल्या मार्गदर्शकास मुकलो : प्रा.डॉ.डी.एल.भारमल

सुभानराव भोसले यांना श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने श्रद्धांजली

सावंतवाडी । प्रतिनिधी : सुभानराव भोसले हे महाविद्यालयाच्या आयक्यूएसी कमिटीचे सदस्य होते . त्यांनी महाविद्यालयाच्या कामकाजामध्ये कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले. राजघराण्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. ते नेहमी आपुलकीने राजवाडा येथे भेट देत असत व महाविद्यालयाच्या विकासासंदर्भात आवर्जून चौकशी करत असत. त्यांचा सहवास अतिशय मोलाचा होता. त्यांच्या जाण्याने एका चांगल्या व्यक्तिमत्त्वाला व मार्गदर्शकाला आम्ही मुकलो, असे भावोद्गार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एल. भारमल यांनी काढले. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य सुभानराव तथा किरण भोसले यांचे १७ डिसेंबर रोजी बांबुळी गोवा येथे अल्पशा आजाराने निधन झाले. या पार्श्वभूमीवर त्यांना महाविद्यालयाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.