रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलनाच्या नोंदणीला चांगला प्रतिसाद

Google search engine
Google search engine

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलनाच्या नोंदणीला जिल्ह्यासह राज्य व देशातील सायकलस्वारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अजूनही नोंदणीसाठी दिवस शिल्लक असून जास्तीत जास्त सायकलपट्टूंनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे करण्यात आले आहे. ८ जानेवारी २०२३ रोजी रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित या संमेलनात चिपळूण, दापोली, खेड सायकलिंग क्लबचे सदस्य तसेच जिल्हा, राज्य व व देशातील नामवंत सायकलतज्ज्ञ व सायकलप्रेमी उपस्थित राहणार आहेत.

हिमालयात सोलो सायकलिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड केलेले मुंबईतील सतीश जाधव हेसुद्धा संमेलनाचा भाग असणार आहेत. संमेलनात सहभागी होणाऱ्या कल्याण येथील सुशांत करंदीकर यांनी आतापर्यंत महाराष्ट्रातले ५० किल्ले सायकलक्रांत केले आहेत. मागच्या वर्षी स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या शताब्दीनिमित्त त्यांनी नवीन १०० किल्ले सायकलक्रांत करायचं ठरवले. बाबासाहेबांशी प्राथमिक बोलणी झाली. ते या मोहिमेला स्वतः हिरवा झेंडा दाखवणार असंही ठरलं. पण त्यांच्या निधनामुळे ही मोहीम थांबली  मग करंदीकर यांनी बाबासाहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 4 नोव्हेंबरपासून मोहीम पुन्हा सुरू केली आहे.

गिर्यारोहक, सायकलपटू आणि जिल्ह्यात अनेक सायकलस्वार तयार करण्यात हातखंडा असलेले, भटक्या खेडवाला नावाने लिखाण करणारे प्रसिद्ध विनायक वैद्य हे सुद्धा संमेलनाचा भाग आहेत. वयाच्या ५२ व्या वर्षी जिद्दीने एसआर झालेले सह्याद्री रेंडोनियर्सचे संस्थापक, सायकलिंगविषयी बाबीची इत्थंभूत माहिती असणारे, नवीन सायकलस्वार तयार व्हावेत यासाठी प्रयत्नशील असणारे चिपळुणचे मनोज भाटवडेकर यांनी देखील संमेलसाठी रजिस्टर  केले आहे. नुकत्याच पंढरपूर ते घुमान सायकलवारी केलेल्या पुणे येथील 75 वर्षीय डॉक्टर निरुपमा भावे या देखील संमेलनासाठी पुण्याहून येत आहेत.

फुटबॉल, सायकलिंग, रनिंगचे मास्टर दापोलीतील एसआर मिलिंद खानविलकर आणि त्यांच्यापासून प्रोत्साहित होऊन दोन वर्षांपूर्वी नियमित सायकलिंग सुरू करून स्वतःच्या जीवनशैलीत आणि प्रकृतीत आमूलाग्र बदल घडवणाऱ्या आणि सायकलवरून पंढरपूर वारी केलेल्या सौ. मृणाल खानविलकर या सुद्धा संमेलनाचा भाग असणारेत.

मॅरेथॉन आणि ट्रायथलॉन फिनिशर, नुकतेच ६०० किमी बीआरएम पूर्ण केलेले डॉ. तेजानंद गणपत्ये आणि १०० ते ३०० किमी बीआरएम पूर्ण केलेल्या, मिलिटरी हॉस्पिटलला डॉक्टर म्हणून सेवा देणाऱ्या त्यांच्या पत्नी डॉ. सौ. अश्विनी गणपत्ये हे दाम्पत्य सुद्धा संमेलनात सहभागी होणार आहेत. मुंबई -कोलकत्ता, मुंबई – वाघा बॉर्डर, शिर्डी, पंढरपूर अशा अनेक सायकल सफरी केलेले, मॅरेथॉन फिनिशर, दापोलीमध्ये सायकलिंग वृध्दींगत करणारे, गिर्यारोहक अंबरीश गुरव हेसुद्धा संमेलनात येणार आहेत. बायपास सर्जरीला बायपास करणारे, सायकलिंग आरोग्याची गुरुकिल्ली म्हणून आत्मसात करणारे, सायकल फिफ्टी किंग मृत्यूंजय खातू संमेलनात उपस्थित राहणार आहेत.

सायकल रेसमधले अव्वल, एसआर, किंग ऑफ कुंभार्ली या संकल्पनेचे जनक, चिपळूणचे  आणि पर्यायाने रत्नागिरीचे  महाराष्ट्रभर वेगवेगळ्या सायक्लोथॉन , मॅरेथॉन स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करणारे प्रसाद आणि विक्रांत आलेकर बंधू देखील संमेलनात सहभागी होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या पहिल्या महिला एसआर बहुमान पटकवणाऱ्या सौ. धनश्री गोखले, रत्नागिरी जिल्ह्याचे पहिले डबल एसआर, गिर्यारोहक, श्रीनिवास गोखले, खेड तालुक्याचे पहिले एसआर, पूर्ण कुटुंबाला सायकलिंगची सवय लावणारे शैलेश पेठे, उत्तराखंड येथे सायकलिंग तसेच ट्रेक अरेंज करणारे उत्तराखंडचे भरतभाई शाह हेसुद्धा संमेलनाची शोभा वाढवणार आहेत. रत्नागिरीत सातत्याने सायकलिंग करणारे दर्शन जाधव यांनी दोन वर्षांत १३ हजार किमी सायकलिंग केले आहे ते सुद्धा संमेलनाचे आकर्षण असणार आहेत.

दोन्ही पाय फॅक्चर झाल्यावर फिजिओथेरपी व सायकलिंगचा व्यायाम सुरू करणाऱ्या रत्नागिरीतील शास्त्रीय गायिका सौ. मुग्धा भट – सामंत आणि आठवड्यातून दोन-तीनदा सायकलवरून कामावर जाणारे त्यांचे पती योगेश सामंत, आपल्या यूट्यूब चॅनेलद्वारे सायकलिंगला प्रोत्साहन देणारे व दररोज जास्तीत जास्त सायकलने प्रवास करणारे महेश दाभोळकर हेसुद्धा संमेलनात सहभागी होणार आहेत.

25 डिसेम्बरपर्यंत रजिस्टर केल्यास संमेलनाचे प्रवेश शुल्क 375 रूपये आहे. त्यानंतर ते रुपये 425 असेल. प्रवेश शुल्कामध्ये चहा, नाश्ता, जेवण समाविष्ट आहे. रजिस्ट्रेशन फॉर्म- https://bit.ly/3GMt22h
अधिक माहितीसाठी एसआर अमित कवितके : 82756 55111, एसआर डॉ. नितीन सनगर : 96898 66099, दर्शन जाधव : 99703 98242, योगेश मोरे : 9920376184, धीरज 83907 64464 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने केले आहे.

नावनोंदणी, अधिक माहितीसाठी मारुती आळीतील भावना ज्वेलर्स येथे नीलेश शहा आणि मारुती मंदिरमधील हॉटेल गोपाळ येथे लाल्याशेठ खातू, फ्लेवर्स हॉटेल, के. सी. जैननगर मारुती मंदिर येथे महेश सावंत, नागरिक सुटिंग्ज, राम आळी येथे एसआर अमित कवितके आणि सुवर्णसूर्य फाउंडेशनचे प्रसाद देवस्थळी यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती घ्यावी.