शालेय जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Google search engine
Google search engine

आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन

कणकवली : कला तपस्वी आप्पा काणेकर चरिटेबल ट्रस्ट आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा कणकवली येथे घेण्यात आली. यामध्ये विविध गटातील 100 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.या स्पर्धेचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन सुप्रसिध्द साहित्यिक बाबुराव शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यामंदीर हायस्कूलचे उपमुख्याध्यापक पी. के. कांबळे, ट्रस्टचे अध्यक्ष महेश काणेकर, कलाशिक्षिका शुभांगी राणे, राकेश काणेकर, श्री. इंगळे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध गटात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. 5 वी ते 6 वी, 7 वी ते 8 वी, 9 वी ते 10 वी, 11 वी ते 12 वी अशा गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेतील प्रत्येक गटामधून प्रथम तीन आणि उत्तेजनार्थ दोन क्रमांक काढले जाणार आहेत.या विजेत्यांना 7 जानेवारी 2023 रोजी कणकवली येथे होणार्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. तर स्पर्धेतील सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेचा निकालही लवकरच जाहिर करण्यात येईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष महेश काणेकर यांनी दिली.