एसपीकेच्या विशाखा गवस व मृणाल देसाई यांची मुंबई विद्यापिठाच्या हँडबाॅल संघामध्ये निवड

सावंतवाडी । प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण विभागीय हँडबॉल स्पर्धा सीकेटी महाविद्यालय पनवेल या ठिकाणी संपन्न झाली. या स्पर्धेत एसपीके महाविद्यालयाच्या मुलींच्या हँडबॉल संघाने कास्यपदक पटकावले . या स्पर्धेतून आंतरविभागीय आंतर महाविद्यालयीन विभागीय हँडबॉल स्पर्धेसाठी तृतीय वर्ष बीए ची विद्यार्थिनी कु. विशाखा मनोहर गवस व तृतीय वर्ष विज्ञान प्राणिशास्त्र विषयाची विद्यार्थिनी कु. मृणाल मनोहर देसाई यांची कोकण विभागीय संघात निवड झाली. कोकण विभागीय संघाने मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन विभागामध्ये सुवर्णपदक पटकावले.

या स्पर्धेतून मुंबई विद्यापीठ हँडबॉल संघामध्ये कु. विशाखा मनोहर गवस व कु. मृणाल मनोहर देसाई यांची पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ हँडबॉल स्पर्धेसाठी महाराजा चित्राल बुंदेलखंड विद्यापीठ छत्रापूर मध्यप्रदेश येथे २७ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले कार्यकारी अध्यक्षा राणीसाहेब शुभदादेवी खेम सावंत भोंसले , कार्यकरी विश्वस्त युवराज लखम सावंत भोंसले, इतर संस्था पदाधिकारी , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी एल भारमल , क्रीडा संचालक प्रा. सी .ए .नाईक यांनी अभिनंदन केले आहे.