कोईळ गणपती मंदिर जीर्णोद्धार वर्धापन दिन २८ डिसेंबर रोजी!

२७ रोजी नेत्र आरोग्य तपासणी शिबिर

मसुरे | झुंजार पेडणेकर : एक गाव एक गणपती अशी ख्याती असलेल्या मालवण तालुक्यतील श्री गणपती देवस्थान कोईळ देवालय जीर्णोद्धार सोहळ्याचा प्रथम वर्धापन दिन सोहळा २८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. २७ डिसेंबर रोजी
नेत्र,आरोग्य तपासणी शिबीर स. ९.३० ते दु. २.०० या वेळेत होईल.
२८ डिसेंबर रोजी
स. ८.०० ते दु.१२.००
धार्मिक विधी, दु. १२.०० ते १.०० महाआरती,
दु. १.०० ते ३.०० महाप्रसाद, सायं. ४.०० ते ५.३० सत्यनारायण पूजा
सायं. ६.०० ते ७.०० आरती, सायं. ७.०० ते रात्रौ ८.०० दिपोत्सव,
रात्रौ ९.०० ते १०.०० सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ११ वाजता
श्री सिद्धीविनायक नाट्य मंडळ – मुंबई
दशावतार नाटक. हार्मोनियम – मयूर गवळी असणार आहेत.
सर्व गणेश भक्तांनी कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन श्री गणपती देवस्थान – कोईळ यांनी केले आहे.