तालीमखाना ते जवाहर चौक रस्त्याचे काम सुरू

राजापूर | प्रतिनिधी : शहरातील रखडलेल्या तालीमखाना ते जवाहर चौक रस्त्याच्या डांबरीकरण-कारपेटचे कामाला शनिवार पासून प्रारंभ झाला आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हे काम चालणार असून या दोन्ही दिवशी शहरातील या मुख्य रस्त्यावरिल एसटीसह सर्व वाहतुक पुर्णपणे बंद रहाणार आहे. शहरातील रखडलेल्या तालीमखाना ते जवाहर चौक रस्त्याच्या डांबरीकरण-कारपेटचे काम गेले महिनाभर रखडले होते. काही तांत्रिक बाबींमुळे हे काम रखडले होते. आता शनिवार पासून हे काम सुरू होणार आहे. पेवर मशिनच्या सहाय्याने या रस्त्याचे डांबरीकरण-कारपेटचे काम केले जाणार आहे.

गेले कित्येक वर्षे हा रस्ता व्हावा अशी नागरिक व वाहन चालकांची मागणी होती. आता काम पुर्ण होणार असल्याने ही मागणी पुर्ण होणार आहे. शनिवारी काम सुरू झाले असून यावेळी नगर परिषदेचे मुख्य लिपीक जितेंद्र जाधव, अभियंता संजीव जाधव, सुनिल पडयार हे प्रत्यक्ष कामाच्या ठीकाणी लक्ष ठेऊन होते. रविवारी हे काम पुर्ण होणार आहे.या रस्त्याचे काम शनिवार व रविवार असे दोन दिवस चालणार असून या कालावधीत तालीमखाना ते जवाहर चौक या मार्गावरिल वाहतुक पुर्णपणे बंद रहाणार आहे. वाहन चालकांना शिवाजीपथ ते वरचीपेठ यासह अन्य पर्यायी मार्गाचा वाहतुकीसाठी वापर करता येणार आहे. या कालावधीत सगळयांनी सहकार्य करावे असे आवाहन भोसले यांनी केले आहे.