चिंचघर प्रभुवाडी खेड येथिल शेताच्या बांधावर आली मगर

Google search engine
Google search engine

वन विभागाने दिले जीवनदान

खेड : खेड येथिल मौजे चिंचघर प्रभुवाडी हर्षदनी खेड येथे शनिवारी 24 डिसेम्बर रोजी नदीच्या प्रवाहातून विक्रांत कदम यांच्या शेताच्या बांधालगत मगर आली. यामुळे एकच घाबरट उडाली. माहिती विक्रांत कदम यांनी दुरध्वनीव्दारे वन विभागाला दिली. कळविलेल्या माहिती अन्वये सदर शेताच्या बांधालगत आलेल्या मगरीचे रेस्क्यु करणेसाठी वनविभागाचे वन्यप्राणी बचाव पथकाने तात्काळ घटणास्थळी पोहचून मगरीला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत सुरक्षीतरित्या ताब्यात घेवून मगरीची पशुवैद्यकिय तपासणी करुन ती सुरक्षित असल्याची खात्रीकरून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

या बचावकार्यात सुरेश उपरे वनपाल खेड, परमेश्वर डोईफोडे वनरक्षक खेड, यांनी सर्वेश पवार, सुरज जाधव, रोहन खेडेकर, श्वेत चोगले व सुमीत म्हाप्रळकर यांच्या मदतीने त्या मगरीस ताब्यात घेवून नैसर्गिक अधिवासात सोडले.सदरचे बचावकार्य मा. विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) श्री. दिपक खाडे, व मा. सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.), रत्नागिरी (चिपळूण) श्री. सचिन निलख यांचे मार्गदर्शनाखाली व श्री. वैभव बोराटे परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली, व त्यांचे अधिनस्त श्री. सुरेश उपरे वनपाल खेड, श्री परमेश्वर डोईफोडे वनरक्षक खेड यांनी श्री सर्वेश पवार, श्री सुरज जाधव, श्री रोहन खेडेकर, श्वेत चोगले, श्री सुमीत म्हाप्रळकर यांचे समवेत पूर्ण केले. मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्याकरता वनविभागाचा टोल फ्रि क्र. १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागामार्फत केले गेले आहे.