वेंगुर्ला प्रतिनिधी
येथील बॅ.खर्डेकर महविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निवासी शिबिराला परबवाडा ग्रामपंचायत येथे प्रारंभ झाला असून या शिबिराचे उद्घाटन सरपंच शमिका बांदेकर यांच्या हस्ते श्रीमती माई परब यांच्या निवासस्थानी वृक्षारोपण करुन करण्यात आले.
प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी ग्रामपंचायत सदस्य पपू परब, हेमंत गावडे, संतोष सावंत, कार्तिकी पवार, स्वरा देसाई, अरुणा गवंडे, सुहिता हळदणकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल परब, माजी सरपंच आपा पवार, माजी उपसरपंच संजय मळगांवकर, विश्वास पवार, प्रा.आनंद बांदेकर, प्रा.व्ही.ए.पवार, कार्यक्रम अधिकारी व्ही.व्ही.सावंत यांच्यासह उदय सावंत, गजानन सावंत, अनिल गवंडे, जीवन परब आदी उपस्थित होते.
सरपंच शमिका बांदेकर यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगून शुभेच्छा दिल्या. तर विष्णू परब यांनी महाविद्यालयीन जीवनातील स्वतःचा अनुभव सांगून स्वयंसेवकांना प्रोत्साहित केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदिप परब यांनी शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपावी असे तर प्राचार्य देऊलकर यांनी शिबिराचे महत्त्व सगून शिस्तीचे पालन करावे असे अ आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नंदगिरीकर यांनी, प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.चुकेवाड यांनी तर आभार प्रा.व्ही.एस.चव्हाण यांनी मानले.