वेंगुर्ला | प्रतिनिधी
परस्परातील राग, मत्सर विसरुन सर्वांमध्ये आपुलकी, प्रेम नांदावे हा येशुचा संदेश देण्यासाठी ख्रिसमसच्या निमित्ताने शांतता फेरी काढली जाते. वेंगुर्ला भाजपचे तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस व भाजपा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सायमन आल्मेडा यांच्या माध्यमातून परबवाडा – मासुरेवाडी येथे शांतता फेरीचे आयोजन केले होते. या शांतता फेरीत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सहभागी होत नाताळच्या शुभेच्छा दिल्या.
यवेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, पपू परब, हेमंत गावडे, इनासिन फर्नांडीस आदी उपस्थित होते. तर शांतता फेरीत शिरील आल्मेडा, निकलस फर्नांडीस, विल्सन फर्नांडीस, दुवाट फर्नांडीस, वॉल्टर डिसोजा, आना डिसोजा, ग्लॅसीस फर्नांडीस, सिल्व्हीया आल्मेडा आदी ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते.