शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये आणि उपतालुकाप्रमुख राजू राणे यांनी दिले राजीनामे
(कणकवली,प्रतिनिधी)
ग्रामपंचायत निवडणुकीत कणकवली तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना झालेला दारून पराभवानंतर पदाधिकाऱ्यांचे राजीनामा नाट्य सुरू झाले आहे. हळवल ग्रामपंचायत शिवसेनेने प्रतिष्ठान केली होती मात्र त्या ठिकाणी भाजपने निर्विवाद यश मिळवल्यामुळे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख राजू राणे यांचे गाव असलेल्या हळवल येथे सेनेला पराभव स्वीकारावा लागला तर उपजिल्हाप्रमुख राजू शेट्टी यांच्या जाणवली गावात सुद्धा शिवसेनेचा दारुण पराभव झाला. याच पार्श्वभूमीवर उपजिल्हाप्रमुख राजू शेट्टी आणि उपतालुका प्रमुख राजू राणे यांनी आपला पदाचा राजीनामा पक्षाकडे दिला आहे. या राजीनाम्यात आपले व्यक्तिगत कारण नमूद केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले असून, शिवसेना उपतालुका प्रमुख पदाचा राजू राणे यांनी नुकताच राजीनामा दिल्यानंतर आता सलग दुसऱ्या दिवशी शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते मानले जाणारे व गेली अनेक वर्ष शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख असलेले राजू शेट्ये यांनी देखील आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे, मी गेली ३५ वर्षे पक्षाशी प्रामाणिक राहून जमेल त्या पद्धतीने पक्षाची सेवा केलेली आहे. या कालावधीत मी पक्षाची विविध पदेही भोगली आहेत. सध्या मी सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख पदावर काम करत आहे, परंतु मला पक्षाला आता वेळ देता येत नसून माझ्या कौटुंबिक कारणामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.
मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत सैनिक म्हणून शेवटपर्यंत राहीन.तरी उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा स्विकारावा असे त्यांनी जिल्हाप्रमुख संजय पडते यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या जानवली ग्रामपंचायतच्या निवडणुकीत ते उमेदवार होते. व त्या ठिकाणी ते पराभूत झाले होते.