कसोटी मालिकाही २ – ० अशी जिंकली
ढाका : भारतीय संघाने बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ३ गड्यांनी विजय मिळवित कसोटी जिंकली. या विजयाने भारताने २ सामन्यांची मालिकाही २-० अशी जिंकून कसोटी क्रिकेट मधील आपला दबदबा कायम राखला.
यापूर्वी झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने बांगलादेशवर २२७ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटीसह मालिका जिंकून भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये आपलं विजयी अभियान कायम ठेवल आहे. बांग्लादेशने अजूनपर्यंत कसोटीमध्ये भारतावर विजय मिळवलेला नाही.
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला २२७ धावांवर रोखल्यानंतर भारतीय संघाने ३३४ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात बांगलादेशने २३१ धावापर्यत मजल मारत भारतासमोर विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे आव्हान स्वीकारून खेळताना भारताच्या आघाडीच्या फळीची पडझड झाली.
त्यामूळे बांगलादेशच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.मात्र, श्रेयस अय्यर नाबाद २९ व रविचंद्रन अश्विन नाबाद ४१ यांनी ८ व्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण ७१ धावांची निर्णायक भागीदारी करून विजय मिळवला. अष्टपैलु खेळी करणारा रविचंद्रन अश्विन प्लेअर ऑफ द मॅच चा मानकरी ठरला. तर चेतेश्वर पुजारा प्लेअर ऑफ द सिरीज ठरला.
Sindhudurg