गुहागर | प्रतिनिधी :
डाँ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान
संचलित, मार्गताम्हाने येथील इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचा नामकरण
सोहळा दि. २७ डिसेंबर रोजी सकाळी 10.वा. आयोजित करण्यात आला आहे. या
शाळेला डि.व्ही. सावरगावकर प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल आणि डाँ.
श्रीधर चितळे सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल असे नामकरण होणार असून
आय.आय.एस.ई.आर कोलकत्ता आणि त्रिवेंद्रमचे अध्यक्ष डाँ. श्री. अरविंद
नातू यांच्याह्स्ते संपन्न होणार आहे.
विशेष अतिथी म्हणून शंतनुराव किर्लोस्कर अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे
विद्यापीठाचे प्राध्यापक डाँ. कँप्टन चंद्रशेखर चितळे उपस्थित राहणार
आहेत. कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक नातू प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाँ. विनय
नातू आहेत. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्वागतोत्सुक
प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाँ. विनय नातू यांनी केले आहे.