मंडणगड | प्रतिनिधी : च्या रत्नागिरी विभागाचे प्रदर्शन आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज लांजा येथे दि.१९/१२/२०२२ रोजी संपन्न झाले. सदर प्रदर्शनात विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे कु. ज्ञानेश्वर जगदाळे व कु. प्रसाद घाणेकर या एफ. वाय. आयटी च्या विद्यार्थ्यांनी “ग्रीन कम्प्यूटिंग फॉर ससटेनेबल डेवलपमेंट” या विषयावर तर कु. गौरव जाधव, कु. अवधूत केळसकर आणि कु. यश चव्हाण या टी.वाय. आयटी च्या विद्यार्थ्यांनी “हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेइकल” या विषयावर आपले प्रदर्शन सादर केले. या पैकी “हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेइकल” या संशोधन प्रकल्पाची निवड प्रथम फेरी मध्ये झाली आहे. सहा. प्रा. राजेंद्र राऊत यांनी रिसर्च समन्वयक व सहा. प्रा.अरुण ढंग यांनी मार्गदर्शक म्हणून आणि वैज्ञानिक श्री. हसमुख सपनावाला यांनी प्रकल्प संकल्पना विकासात विशेष मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. अंशुमन मगर, संचालक डॉ. किशोर सुखटणकर व सर्व शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.