मयेकर महाविद्यालयाचा २०२२ – २३ या वर्षातील कॉलेज किंग पवन माचिवले तर कॉलेज क्विन वृषाली घाणेकर

Google search engine
Google search engine

मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे चा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाला. दिनांक १९ ,२० ला क्रीडा व २१ ते २३ डिसेंबर २०२२ रोजी सांस्कृतिक महोत्सव आनंदात पार पडले.
अभिनय व नृत्यातील अनेक प्रकार विद्यार्थ्यांनी उत्साहात सादर केले. चित्रकला प्रकारातही व्यंगचित्र, पोस्टर, रांगोळी, नेलआर्ट, मेहंदी, मातीशिल्प असे अनेक प्रकारात विद्यार्थ्यांनी सहभाग दाखवला.
या सर्व स्पर्धांबरोबरच चॉकलेट , रोज, कॉलेज किंग व क्विन याची निवड करण्यात आली. कॉलेज क्विन वृषाली घाणेकर , कॉलेज किंग पवन माचिवले यांची निवड झाली. रोज क्विन श्रृती तेरेकर , रोज किंग प्रणय माईन तसेच चॉकलेट क्विन प्रज्ञा बारगोडे तर चॉकलेट किंग शुभम सोबळकर यांना विद्यार्थ्यांनी निवडले.
२०२२ -२३ या वर्षातील क्रीडा महोत्सवाचे वार्षिक फिरत्या चषकाचे मानकरी तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थी तर सांस्कृतिक महोत्सवाचे वार्षिक फिरत्या चषकाचे मानकरी तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचे विद्यार्थी झाले.
संस्थेचे अध्यक्ष मा. सुनीलजी मयेकर यांनी विद्यार्यांना स्वत:च्या महाविद्यालयीन जीवनातील किस्से सांगत मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहा पालये यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. गुरूनाथ सुर्वे यांनी सर्व प्राध्यापकांच्या सहाय्याने कार्यक्रमाचे नियोजन केले.
यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सुनीलजी मयेकर, उपाध्यक्ष नंदकुमार साळवी, सचिव रोहित मयेकर, खजिनदार रूषिकेश मयेकर, किशोर पाटील, संचालक मेहंदळे गुरूजी, सुरेंद्र माचिवले, ओरी चे उपसरपंच संकेत देसाई , प्र. प्राचार्या स्नेहा पालये, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम, प्राध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.