उद्योजक बना! रोजगारीतून विकास करा! केंद्रिय उद्योग मंत्री नारायण राणे.

सिंधुनगरी येथे देशातील १६ व्या नँशनल एस सी एस टी हब चे उद्घाटन!

सिंधुनगरी | प्रतिनिधी :

उद्योजक बना व जिल्ह्याच्या विकासात गती द्या जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न वाढविण्यास हातभार लावा! यासाठी सरकारचा उद्योग विभाग आपल्या पाठीशी आहे. आता उद्योजकांनी आता पुढाकार घ्यावा असे आव्हान केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सिंधुनगरी येथे देशातील सोळाव्या नॅशनल एससी एसटी हबच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना काढले.
सिंधुनगरी नवनगर प्राधिकरण क्षेत्रात या कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले यावेळी या विभागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक श्री गौरांग दीक्षित, श्री वरिष्ठ अधिकारी रविकुमार, मनोजकुमार सिंग उपस्थित होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिश दळवी, विजय केनवडेकर भाजप जिल्हा सचिव प्रभाकर सावंत संतोष वालावलकर आदी उपस्थित होते.
देशातील हे १६ वे कार्यालय या जिल्हयात होत असून या जिल्हातील अनुसुचीत जाती व अनुसुचीत जमातीच्या नागरिकांनी या कार्यालयाचा उपयोग करुन घ्यावा व उद्योजक बनावे असे आवाहन नारायण राणे यांनी केले. हे कार्यालय या प्रवर्गातील उद्योजक घटकासाठी मदत करणार आहे. उद्याग उभारणीसाठी अनुदानावरील कर्ज योजना व आवश्यकती मदत हा विभाग करणार आहे. त्यामुळे जिल्हातील तरुण तरुणी उद्योजकानी याचा फायदा घ्यावा असे आवाहनही नारायण राणे यांनी केले.
देशात या प्रवर्गातील ९६ हजार उद्योजकांनी फायदा घेऊन आपले उद्योग निर्माण केले आहेत. सिंधुदुर्गातही या योजनेतून १०६ उद्योजकांना फायदा दिला असून उद्योजक बनविले आहे. या योजनेचा व या कार्यालयाचा फायदा या जिल्हयातील अनुसुचित जाती जमातीच्या नव उद्योजक व नागरीकांनी घ्यावा व आपला रोजगार निर्माण करावा असे आवाहनही नारायण राणे यांनी केले. देशातील १६ वे कार्यालय या जिल्हयात सुरु होत आहे हे जिल्हावासियांसाठी व उद्योजकांचे भाग्य आहे असेही ते म्हणाले.