जनसेवा निधी संस्थेतर्फे देण्यात येणारे पुरस्कार जाहिर

Google search engine
Google search engine

प्रा. सुरेश गावडे, तेजस बांदिवडेकर, दिप्ती प्रभू, सुषमा केणी यांचा समावेश

बांदा । प्रतिनिधी : जनसेवा निधी संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. रविवार दिनांक १ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १ येथे पत्रकार शेखर सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.

आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद शाळा वजराट नंबर १, ता. वेंगुर्ले प्रशाळेचे शिक्षक तेजस विश्वनाथ बंदिवडेकर, आदर्श माध्यमिक शिक्षिका पुरस्कार श्री देवी सातेरी हायस्कुल वेतोरे प्रशालेच्या शिक्षिका दीप्ती मोतीराम प्रभू, आदर्श समाजसेविका पुरस्कार सुषमा दयानंद केणी (कणकवली), आदर्श मुख्याध्यापक (माध्यमिक शाळा) पुरस्कार सिंधुदुर्ग सैनिक स्कुल व ज्युनियर कॉलेज, आंबोलीचे प्राचार्य सुरेश तुकाराम गावडे यांना जाहीर करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात दहावीच्या परीक्षेत बांदा केंद्रात इंग्रजी विषयात प्रथम आलेली रिद्धी महेश तळेगावकर, प्रणाली शांताराम असनकर, मराठी विषयात प्रथम आलेला हर्ष नारायण शिरोडकर, प्रणव गणपत नाईक, विज्ञान विषयात पहिली आलेली रिद्धी तळेगावकर, गणित विषयात पहिला आलेला संकेत प्रेमानंद देसाई, बारावी परीक्षेत बांदा केंद्रात प्रथम आलेली प्राजक्ता मुकुंद डुगल या विद्यार्थ्यांना देखील गौरविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जनसेवा निधी संस्थेचे विश्वस्त डॉ. मिलिंद अरविंद खानोलकर यांनी केले आहे.

Sindhudurg