श्री देवी माऊली भजन मंडळ, साटेली संघ ठरला प्रथम
वेंगुर्ले : प्रतिनिधी
तुळस भजनप्रेमी आयोजित “जिल्हास्तरीय निमंत्रित संगीत भजन स्पर्धा 2022” या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सादरीकरण करत श्री देवी माऊली भजन मंडळ, साटेली या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. तुळस येथील या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते दीपप्रजुलाने करण्यात आले यावेळी तुळस सरपंच सौ. रश्मी रामचंद्र परब, देवस्थान मानकरी यशवंत परब, अनिल परब, दिवाकर परब, बाबा परब, परीक्षक – श्रीराम दीक्षित व मोहन मेस्त्री, रजबा सावंत, ग्रा. पं. सदस्य – जयवंत तुळसकर, सचिन नाईक, रुपेश कोचरेकर, रमाकांत ठुंबरे, सौ. चरित्रा परब, सौ. विनिता शेटकर, सौ. अपर्णा गावडे, सौ. स्वाती सावंत, सौ. रतन कबरे, श्री. महेश बरागडे. संदीप पेडणेकर, बाळू राऊळ, बाबा राऊळ, कृष्णा परब आदी उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये एकूण 10 संघ सहभागी झाले होते. द्वितीय क्रमांक : श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी, तृतीय क्रमांक : श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी, उत्तेजनार्थ प्रथम : स्वरसाधना संगीत भजन मंडळ, डिगस, उत्तेजनार्थ द्वितीय : श्री सनामदेव प्रासादिक भजन मंडळ, सांगेली- सनामटेंब, शिस्तबद्ध संघ : श्री देवी भवानी प्रासादिक भजन मंडळ, न्हावेली, उत्कृष्ट कोरस : श्री साटम महाराज भजन मंडळ, निरवडे- झरबाजार, उत्कृष्ट गायक : बुवा श्री. सत्यनारायण कळंगुटकर (साटेली), उत्कृष्ट हार्मोनियम वादक : श्री. भार्गव गावडे (नेरूर ), उत्कृष्ट पखवाज वादक : श्री. भावेश राणे (सांगेली ), उत्कृष्ट तबला वादक : श्री. ओंकार राऊळ (पिंगुळी ), उत्कृष्ट झांज वादक : श्री. रोहन गवस (पाडलोस) यांना मिळाले.बक्षीस वितरण सोहळ्यास रामू परब, ग्रां. पं. सदस्य जयवंत तुळसकर, रुपेश कोचरेकर, विजय रेडकर, सागर सावंत, रमेश परब, सुधीर भगत, नामदेव सावंत, मंदार तुळसकर – तंटामुक्ती अध्यक्ष, संदीप पेडणेकर, प्रल्हाद राणे, सुधीर भगत आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण मोहन मेस्त्री व श्रीराम दीक्षित यांनी केले. स्पर्धेचे निवेदन काका सावंत यांनी केले.