भाजपाने भ. वि आघाडीने निवेदन देत पोलीस अधीक्षकांचे वेधले लक्ष..
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील चांदोर गावातील शेतकऱ्यांचे पशुधन सतत चोरीला जात असल्याने याबाबत स्थानिकांच्या भावना लक्षात घेता. भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी चे जिल्हाध्यक्ष निलेश आखाडे यांच्यासह स्थानिक शेतकरी व भाजपा पदाधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी सर यांची भेट घेत निवेदन सादर केले. रत्नागिरी तालुक्यातील चांदोर गावामध्ये धनगर वसाहती मधील पशुधनाची अनेकदा चोरी झाली आहे. संबंधित पशुपालकांनी याबाबत पावस पोलीस स्टेशन येथे तक्रार देखील दाखल केले आहेत. या स्थानिक तक्रारदार शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांना तक्रारीचा अर्ज दिला असता यावर पोच दिली जात नाही. चोरी प्रकरणी एफ.आय.आर तातडीने दाखल करून घेणे आवश्यक असताना देखील एफ.आय.आर घेण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे ही चोरीची प्रकरणे दुर्लक्षित राहतात. कोर्टात जाऊन तक्रार करा मग आम्ही तपास करू असे देखील काही शेतकऱ्यांना सांगितले गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. धनगर वाड्या वस्त्यांमधील शेतकरी यांचा उदरनिर्वाह या पशुधनावर चालत असतो आणि याचीच चोरी होत असल्याने तेथील गरीब शेतकरी त्रस्त आहे. आणि या चोरीच्या घटना सतत घडत आहेत. याबाबत तक्रार दाखल करून न घेतल्यास शेतकऱ्यांना न्याय मिळणार नसेल तर स्थानिक नागरिकांसह आंदोलनात्मक पवित्रा घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश आखाडे यांनी दिला.
यातीलच एक तक्रारदार सखाराम भन्या कोकरे यांच्या घरी मागील एका वर्षात तीन वेळा चोरीचे प्रकरण घडले मात्र पोलिसांनी यांची देखील FIR दाखल करून घेतली नाही. या चोरीला गेलेल्या बकऱ्यांपैकी एक बकरी त्यांना बाजूच्या एका गावात दिसून आली मात्र पोलीस याबाबत प्रतिसाद देत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी भटके मुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश आखाडे यांनी पदाधिकारी व शेतकऱ्यांसह पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट घेतली कुलकर्णी सर यांनी तातडीने याबाबत दखल घेत तक्रार दाखल करून योग्य ती चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय दिला जावा अशा सूचना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना केल्या आहेत. याबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी भूमिका स्थानिक नागरिकांची आहे. यावेळी स्थानिक शेतकरी, तक्रारदार सखाराम मन्या कोकरे, प्रदीप शंकर कांबळे, अंकुश सखाराम कोकरे, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे भ. वि. जिल्हाध्यक्ष निलेश आखाडे, जिल्हा उपाध्यक्ष अनंत जाणू खरात, पदाधिकारी योगेश झोरे, सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश बोडेकर आदी उपस्थित होते. आता पोलीस तपास अधिक जलद गतीने होणार का? शेतकऱ्यांना न्याय मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.