जेष्ठानी आरोग्याबाबत वेळीच खबरदारी घ्यावी! अशोक कांबळी यांचे प्रतिपादन

Google search engine
Google search engine

हडी जेष्ठ नागरीक संघाचा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरा

मसुरे | झुंजार पेडणेकर : जेष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून जेष्ठांनि एकमेकांच्या समस्या सोडवाव्यात. जेष्ठ ग्रामस्थांनी आरोग्य बाबत वेळीच खबरदारी घ्यावी. योगासन, प्राणायाम अत्यावश्यक आहे. कुटूंबात तुमचा मान राखला जावा यासाठी विविध घटकांशी तुमचे संबंध चांगले ठेवा. सर्वांना समजून घेण्याची जबाबदारी तुमची आहे. असे प्रतिपादन आचरा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी यांनी हडी येथे केले. फेस्कोम संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या पंधराव्या वर्धापन दिन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचा प्रारंभ साने गुरुजींच्या प्रार्थनेने झाला. यावेळी अध्यक्ष श्रीमती चंद्रकला कावले, दिलीप करंदीकर, उमेश हडकर, सूर्याजी पाटील, मनाली फाटक, सौ संपदा परब, डॉ.संदीप कदम, सौ रूपा सांडव, ग्राम.सदस्य भरत लाड, सुवासिनी वाळवे, प्रज्ञा सुर्वे, प्राची मयेकर,दीक्षा गावकर, कीर्तनकार हृदयनाथ गावडे, उपाध्यक्ष रामचंद्र हडकर, सचिव सुभाष वेंगुर्लेकर, सल्लागार चंद्रकांत पाटकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी सरपंच प्रकाश तोंडवळकर यांनी शुभेच्छा दिल्या. सल्लागार चंद्रकांत पाटकर यांनी प्रास्ताविक करताना जेष्ठां साठी अनेक योजना आहेत त्याचा लाभ घ्या.मासिक सभेला जास्तीत जास्त सदस्यांनी उपस्थित रहावे. गावातील विविध समस्यावर जेष्ठ नागरिक संघाकडून निश्चित पणे आवाज उठवण्यात येईल असे सांगितले. यावेळी संघाच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य, वैवाहिक जीवनाची ५० वर्ष पूर्ण केलेल्या सौ. सुनंदा देऊ भोजने या दाम्पत्याचा
तसेच ७५ वर्ष पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

तसेच दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी संचलनात सहभागी होणाऱ्या आचरा कॉलेजच्या संघातील सर्वांचा सन्मान करण्यात आला.जेष्ठ ग्रामस्थां साठी हभप हृदयनाथ गावडे यांचे कीर्तन झाले.त्यास संगीत साथ दुर्वांक गावडे व आनंद परब यांनी केली. यावेळी उपसचिव रमाकांत सुर्वे, कोषाध्यक्ष मोहन घाडीगांवकर, लेखापाल प्रभाकर तोंडवळकर, दिनकर सुर्वे, शांताराम साळकर, सदस्य गणू परब, गणेश परब, शंकर पाटील, जानू कदम, सौ प्रज्ञा तोंडवळकर, रमेश कावले, सौ. वनिता हडकर, सौ. मनीषा पोयरेकर, श्रीधर परब, प्रभाकर चिंदरकर आदी उपस्थित होते. स्वागत श्रीमती चंद्रकला कावले, आभार सुभाष वेंगुर्लेकर यांनी मानले.