रीतिरिवाज जपून पुण्य कमवा ! श्री श्री १०८ महंत मठाधिश प. पू. गावडेकाका महाराज यांचे आवाहन

श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट वर्धापन दिन उत्साहात

मसुरे | झुंजार पेडणेकर : आपल्या पूर्वजानी रितीरिवाज जपून पुण्य कमावल्यामुळे त्याचे फायदे आपण घेत आहोत. तुम्ही सुद्धा पुण्य कमवा. दातृत्व, प्रेम भावना ठेवा.जीवनशैली सुसंस्कृत आणि आनंदित होण्यासाठी दातृत्वाची भावना ठेवा. स्वामी समर्थ मठाच्या माध्यमातून अनेकांना वैधकीय मदत, अनेक संसार सावरण्यासाठी मदत केली जाते. एक एक रुपया लोक कल्याणासाठी वापरला जात आहे. कोरोना काळात आपल्या मदतीचा अनेकांना दिलासा लाभला होता. तुमच्यातील दातृत्व असेच कायम ठेवा. असे आवाहन श्री श्री १०८ महंत मठाधिश प. पू. गावडेकाका महाराज यांनी येथे केले. श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास रजि. संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे, वडाचापाट – मालवण येथे  श्री स्वामी समर्थ मठाचा ११ वा वर्धापन दिन सोहळा विविध उपक्रमांनी संपन्न झाला.

सकाळी श्री स्वामी समर्थांची षोडशोपचार पूजाअर्चा, पालखी पूजन,अक्कलकोट पादुका आणि पालखी मिरवणूक,त्यानंतर श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरु श्री गावडेकाका महाराज यांचे आगमन आणि अध्यात्मिक मार्गदर्शन झाले.
दुपारी भाविक भक्तांच्या वतीने सामुहिक स्वामींना नैवेद्य अर्पण, महाआरती,महाप्रसाद अन्नदान,
सायंकाळी सुस्वर भजने,रात्रौ अमृत नाथ दशावतार नाटय मंडळ, गांव- म्हापण यांचा ‘कुर्मदासाची वारी’ हा दशावतार नाट्यप्रयोग झाला.यावेळी श्री सद्गुरू भक्त सेवा न्यासचे विश्वस्त सिद्धेश किऺनळेकर,सौ.कुशे मॅडम, श्री आबेसकर, निशिकांत पिऺगुळकर, देविदास रेडकर,ह भ‌प श्यामसुंदर परब, दादा गावडे, माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई, रविंद्र प्रभूदेसाई,केंद्र प्रमुख साई पेडणेकर,सौ सीता गावडे, जिजी पाटकर, तानाजी पाटील, दिलिप देसाई, कोळंब सरपंच सौ सिया धुरी, सुधीर पडेकर, गौतम खोत, गोपाळ पालव आदी स्वामी सेवक उपस्थित होते.