उद्योजक विशाल परब यांची असणार प्रमुख उपस्थिती..!
कणकवली : भजन क्षेत्रातील सर्वांचे लाडके प्रेरणास्थान महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त कोकणकलाभूषण सुप्रसिद्ध भजनकार भजनसम्राट कैलासवासी बुवा चंद्रकांत काशीराम कदम (गुरुदास) यांचा अठरावा स्मृतिदिन दिनांक २९ आणि ३० डिसेंबर २०२२ रोजी साजरा करण्यात येणार आहे. संगीतमय वातावरण,नेत्र दीपक पालखी मिरवणूक,मान्यवरांची उपस्थिती आणि सर्वांच्या साक्षीने हा सोहळा पार पडणार आहे.तरी ज्येष्ठ भजनी कलावंत आणि तमाम भजन रसिकांनी सहकुटुंब या दिमागदार सोहळ्यास उपस्थित राहून संपूर्ण गुरुत्वास शिष्य परिवाराचा आनंद वाढवावा करावा असे निमंत्रण गुरुदास शिष्य परिवार आणि आरे, वळीवडे ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात येत आहे.
या कार्यक्रमानिमित्त जिल्हास्तरीय वारकरी दिंडी भजन स्पर्धेचे आयोजन गुरुवार दिनांक २९ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आलेल आहे. शुक्रवार दिनांक ३० डिसेंबर २०२२ रोजी सकाळी सात वाजता स्मारकाजवळ गणेश पूजन करण्यात येणार आहे.सकाळी साडेसात वाजता मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून ७ : ४५ वाजता सुप्रसिद्ध भजनकार संगीत अलंकार सन्माननीय दिप्तेश मेस्त्री यांचे सुश्राव्य गायन होणार आहे. तसेच सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे सकाळी नऊ वाजता पालखी मिरवणुकीस प्रारंभ होईल,गुरुदास यांच्या आरेगाव येथील घरातून पालखी प्रस्थान करणार आहे आणि सकाळी ११ :४५ वाजता गुरुदास स्मारकाजवळ या पालखीचे आगमन होणार आहे. दुपारी बारा वाजता मान्यवरांचा सत्कार व आभार प्रदर्शन, दिंडी भजन स्पर्धेचा बक्षीस समारंभ व दुपारी एक वाजता स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सन्माननीय उद्योजक विशाल परब असणार आहेत तर या कार्यक्रमाचे निवेदन सन्माननीय राजा सामंत हे करणार आहेत