दापोली अर्बन बँकेत नोकरभरतीत स्थानिकांनाच प्राधान्य देणार जयवंत जालगावकर

Google search engine
Google search engine

दापोली | प्रतिनिधी : जिल्हयातील मोठी अग्रगण्य बॅंक असलेल्या दापोली अर्बन को ऑप. बँकेत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिकांनाच भरती प्रक्रियेत प्राधान्य मिळावे यासाठी संचालक मंडळ निश्‍चितपणे प्रयत्न करेल, असा विश्‍वास अध्यक्ष जयवंत जालगावकर यांनी व्यक्त केला. बँकेच्या रत्नागिरी शाखचा २५ वा वर्धापन दिन अल्पबचात सभागृहात सभासद, हितचिंतक, संचालक मंडळ आदींच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. ग्राहकांची सेवा हेच ब्रीद वाक्य घेवून बँकेची स्थापना करण्यात आली असून रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात १३ शाखा कार्यरत आहेत. कोकणातील जनतेसाठी विकासाची दारे खुली करणारे ही बँक आहे.सभासद, ठेवीदार, व्यापारी यांची ६३ वर्षे विश्‍वासाने जपणूक करणार्‍या बँकेच्या रत्नागिरी शाखेने २५ वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. भविष्यातही बँकेमार्फत ग्र्राहकांची सेवा करण्याची संधी मिळवी, अशी अपेक्षा जयवंत जालगावकर यांनी व्यक्त केली. माधव शेट्ये, उपाध्यक्ष संदीप दिवेकर, सुभाष मालू, विनोद आवळे, मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी थोरात, रमेश कडू, नरेंद्र आयरे, सिद्धेश साक्षीकर उपस्थित होते.