पाटपन्हाळे विद्यालयात वीर बालदिवस कार्यक्रम साजरा

पाटपन्हाळे | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयात मुख्याध्यापक श्री.एम.ए.थरकार यांच्या अध्यक्षतेत वीर बालदिवस नुकताच कार्यक्रम संपन्न झाला. बलिदानपुत्र (वीरपुत्र )श्री. जोरावरसिंह व श्रीफतेसिंह यांच्या सर्वोच्च बलिदानाबाबत तसेच शीख संप्रदाय सन्मान , अस्मिता हेतू व रक्षण या उद्देशाने वीर बालदिवस कार्यक्रम नुकताच न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयात मुख्याध्यापक श्री. एम.ए.थरकार यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका व सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस.एस. चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. विद्यालयातील शिक्षक श्री.एस.वाय.भिडे यांनी वीर बालदिवस साजरा करण्याचा हेतू , श्री.जोरावरसिंह व फतेसिंह यांचे कार्य व योगदान , पराक्रमाची जाणीव निर्माण करणे आदी मुद्द्यानुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक एम.ए.थरकार यांनी देशातील विविधता , वीर पुरुषांचे योगदान , श्रीजोरावरसिंह व फतेसिंह यांचे योगदान आदी विषयांबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला पर्यवेक्षक श्री.एस.टी.गावडे , शिक्षक श्री.एस.एम.आंबेकर व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.मुख्याध्यापक , शिक्षक व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभल्याबद्दल सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस.एस.चव्हाण यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला