विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
गुहागर | प्रतिनिधी : तालुक्यातील तळवली गट विकास मंडळाचा हिरक महोत्सव व पाटपन्हाळे एज्युकेशन संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल तळवलीचा सुवर्णमहोत्सव कार्यक्रम 31 डिसेंबर व 1 जाने 2023 असा दोन दिवस विविध भरगच्च कार्यक्रमानी तळवली न्यु इंग्लिश स्कुलचे भव्य पटांगण येथे साजरा होणार आहे. यावेळी शनिवार दिनांक 31 रोजी सकाळी 8.30 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी 11 ते 2 न्यु इंग्लिश स्कुल तळवली माजी विद्यार्थी स्नेह मेळावा,रात्री 8 ते 10 न्यु इंग्लिश स्कुल तळवली माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम तर रविवार दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 ते 2 वा. हिरक महोत्सव व सुवर्ण महोत्सव मुख्य कार्यक्रम, रात्रौ 9.30 वाजता सिने व नाट्य अभिनेता श्री विजयराव गोखले मुंबई व श्री विघ्नेश जोशी मुंबई यांचा विनोदी कार्यक्रम गोलगप्पा विविध सन्मानाने पुरस्कृत बालकलाकार तबला वादक विहंग मुळे याचे तबला वादन तसेच सोमवार दिनांक 2 जानेवारी रात्रौ 9.30 वाजता न्यु इंग्लिश स्कुल तळवलीचे माजी विद्यार्थी यांचे दंगा आर्टस् मुंबई निर्मित दोन अंकी नाटक झोंबी हा नाट्यप्रयोग पार पडणार आहे.या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन तळवली गटविकास मंडळ मुंबई अध्यक्ष विनायक मुळे, हिरक व सुवर्ण महोत्सव कमिटी अध्यक्ष दत्तकुमार शिगवण,प्राचार्य बसवंत थरकार व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप चव्हाण यांनी केले आहे.