लोकशाही दिन 02 जानेवारी रोजी

Google search engine
Google search engine

रत्नागिरी : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही
दिन साजरा होतो. माहे जानेवारी 2023 चा लोकशाही दिन 02 जानेवारी 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दु.
1.00 ते 2.00 या वेळेत होणार आहे. लोकशाही दिनाकरीता नागरीकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर
करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरीकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही
दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे शुभांगी साठे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.)
जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांनी कळविले आहे.