मसुरे | झुंजार पेडणेकर : महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्ग शाखा मालवणचा स्नेह मेळावा नांदोस कट्टा येथील श्री विनोद अशोक गगनग्रास यांच्या घरी श्री आशिष आपटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. श्री गणेश पूजन , श्री परशुराम महाराज स्मरण ,गोपूजन विधीने कार्यक्रम प्रारंभ झाला. यावेळी एकूण ५२ बांधव उपस्थिती होते. यजमानपद श्री स्वप्निल आपटे तसेच पौरोहित्य श्री मंदार सरजोशी यांनी सांभाळले.संमेलनाचे दीप प्रज्वलन श्री भालचंद्र केळकर, श्री आशिष आपटे, श्री मंदार सरजोशी यांच्या हस्ते करण्यात आले. सामूहिकरित्या श्री अथर्वशीर्ष पठण करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक श्री श्रीकृष्ण अच्युत वझे व सौ. मेघना जोशी यांनी ब्राह्मण ज्ञाती ला आचार ,विचार ,संस्कार, धार्मिक दृष्टिकोन याबद्दल उत्तम असे मार्गदर्शन केले.
श्री. निलेश सरजोशी तसेच श्रीमती अर्चना हर्डीकर व श्री श्रीपाद गिरसागर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री आनंद आपटे यांनी मधमाश्यांचे संरक्षण व संवर्धन माहिती दिली. त्याच बरोबर विविध वृक्ष वाटप केले. श्रीमती अर्चना हर्डीकर यांनी जिल्हा संमेलनाविषयी माहिती दिली व आभार मानले.पुढील तालुका संमेलन मसुरा विभागात होणार असल्यामुळे मसुरा विभाग अध्यक्ष श्री मिलिंद कुंटे यांनी श्री स्वप्निल आपटे यांच्या हस्ते संमेलनाचा नारळ स्वीकारला. भोजन व्यवस्था श्री प्रसाद नातू ( कुडाळ )यांनी उत्तमरीत्या बजावली. सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री उदय मेहंदळे यांनी केले.