पोलीस हवालदार संदीप गुजर यांचे हृदय विकाराचे झटक्याने निधन

मंडणगड | प्रतिनिधी :  मंडणगड पोलीस स्थानकात पोलीस हवालदार पदी कार्यरत असलेले श्री. संदीप प्रकाश गुजर वय (45) मुळगाव पालवणी जांभुळनगर सध्या राहणार आवाशी तालुका खेड यांचे आज (28) रोजी पोलीस स्थानकात कर्तव्यावर असतान सकाळच्या सुमारास हृदय विकाराचा झटका आल्याने निधन झाले. त्याच्या पार्थिवांचे मंडणगड ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करुन पार्थीव त्यांचे परिजनांचे ताब्यात देण्यात आले व आवाशी येथे त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा व कुटुंबीय आहेत.