हिंदळे-मोर्वे शाळेचा शतक महोत्सव ३० डिसेंबर पासून!

Google search engine
Google search engine

मसुरे | झुंजार पेडणेकर : जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, हिंदळे-मोर्वे शाळेस १ जानेवारी २०२३ रोजी १०० वर्षे पुर्ण होत आहेत. यानिमित्त शाळा व्यवस्थापन समिती, शतक महोत्सव समिती, पालक, ग्रामस्थ आणि आजी-माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने शाळेचा ” शतक महोत्सव सोहळा” ३० डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२३ या कालावधीत संपन्न होणार आहे. यानिमित्त शुक्रवार दि. ३० डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९:०० वा. रक्तदान व आरोग्य शिबीर,रात्रौ ९:०० वा. रंगमंच उद्घाटन श्री. प्रकाश तळवडकर (अध्यक्ष शतक महोत्सव समिती) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल.उद्घाटक श्री. सहदेव बापर्डेकर, (उद्योगपती मोर्वे) यावेळी प्रमुख पाहुणे श्री. प्रजापती थोरात (गटशिक्षणाधिकारी, पं. स. देवगड) श्री. नामदेव सावळे (केंद्रप्रमुख, केंद्रबल गट, हिंदळे.) उपस्थित राहणार आहेत. रात्रौ १०:०० वा. ‘रंग लोककलेचे’ हा कार्यक्रम होईल.

शनिवार ३१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९:०० वा. रॅली (हिंदळे-मिठबाव पूल ते मोर्वे शाळा) उद्घाटक श्री. सुनिल पारकर (माजी सभापती, देवगड),श्री. प्रकाश बाळकृष्ण राणे (माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंधुदुर्ग), श्री. सत्यवान परब (बांधकाम व्यवसाईक ), रात्रौ ९:३० वा. मोर्वे शाळा माहितीपट प्रकाशन सोहळा श्री. अरविंद सारंग (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल.उद्घाटक श्री. अरविंद मोर्वेकर (शतक महोत्सव सांस्कृतिक कमिटी सदस्य) प्रमुख पाहुणे अॅड. श्री. विनायक वेंगुर्लेकर,अॅड. श्री. नरेश दहिबांवकर (अध्यक्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मुंबई),रात्रौ १०:०० वा. सांस्कृतिक कार्यक्रम होतील.रविवार दि. १ जानेवारी २०२३सकाळी ८:३० वा. श्री सत्यनारायण महापूजा,सकाळी ९ : ३० वा. अल्पोपहार, सकाळी १०:०० वा. बक्षीस वितरण समारंभ व सत्कार श्री. नामदेव बापर्डेकर (अध्यक्ष शतक महोत्सव समिती, मुंबई), यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल.
यावेळीखासदार श्री. विनायक राऊत, आमदार श्री. नितेश राणे, सीईओ प्रजित नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी
श्री. राजेंद्र पराडकर, गटविकास अधिकारी श्री. अरुण चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)श्री. महेश धोत्रे, गटशिक्षणाधिकारीश्री. प्रजापती थोरात, केंद्रप्रमुख श्री. नामदेव सावळे उपस्थित राहणार आहेत. दुपारी १:०० वा. महाप्रसाद, संध्याकाळी ५:०० वा. हळदीकुंकू व बक्षीस वितरण समारंभ. रात्रौ १० : ०० वा. नाट्यप्रयोग जि. प. पू. प्राथमिक शाळा मोर्वे आजी-माजी विद्यार्थी वश्री सद्गुरु नाट्य मंडळ, मोर्वे प्रस्तुत ‘मालवणी शोले’ धमाल विनोदी नाटक होणार आहे.तरी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती, मोर्वे शतक महोत्सव समिती, मोर्वे- मुंबई यांनी केले आहे.