चला रत्नागिरी बघूया… !

एसटीच्या रत्नागिरी दर्शन बसफेरीला सुरुवात

रत्नागिरी । प्रतिनिधी : थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांच्या सेवेकरिता एसटी विभाग सज्ज झाला असून पर्यटकांसाठी आज 28 डिसेंबर पासून रत्नागिरी दर्शन बस फेरी सुरू करण्यात आली आहे. १ या बसमधून रत्नागिरी आणि रत्नागिरीच्या परिसरातील अनेक पर्यटन स्थळांना पर्यटकांना भेट देता येणार आहे आज बुधवारी 28 डिसेंबरला सकाळी आठ वाजता पहिली गाडी रत्नागिरी दर्शन साठी सुटली यामध्ये १६ प्रवासी होते. ही गाडी आडिवरे, कशेळी कनकादित्य मंदिर, कशेळी देवघळी, गणेशगुळे, पावस, थिबा राजवाडा, भगवती किल्ला, टिळक जन्मस्थान, आरेवारे समुद्रकिनारा, गणपतीपुळे या ठिकाणी भेट देणार आहे. सायंकाळी ७ वाजता ही बस पुन्हा आरेवारे मार्गे रत्नागिरी बस स्थानकात पोचणार आहे.

रत्नागिरी दर्शन बसफेरी १ जानेवारी पर्यंत असून या गाडीतून प्रवास करण्यासाठी तिकीट दर मोठ्या प्रवाशांसाठी ३०० रुपये आणि लहान मुलांसाठी 150 रुपये आकारण्यात आला आहे. थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी अलीकडे पर्यटकांची रत्नागिरी सारख्या शांत ठिकाणाला पसंती मिळते. पर्यटक मोठ्या संख्येने रत्नागिरीत येत असतात त्यांना वाहन अभावी सर्वच पर्यटनस्थळांना भेटी देता येत नाहीत अशा वेळेला रत्नागिरीच्या अशा वेळेला एसटी विभागाने राबविलेल्या या उपक्रमामुळे पर्यटनालासुद्धा चालना मिळणार असून एसटी विभागाचे त्या बद्दल कौतुक केले जात आहे. या रत्नागिरी दर्शन खास बस फेरीमुळे पर्यटकांना एकाच दिवसात रत्नागिरी आणि राजापूर आतील पर्यटन स्थळांना भेटी देणे शक्य झाले आहे.