निवृत्त तलाठी प्रकाश गोयथळे यांचे निधन

गुहागर | प्रतिनिधी :निवृत्त तलाठी प्रकाश शांताराम गोयथळे यांचे अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या निवासस्थानी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७४ वर्षे होते.प्रकाश गोयथळे हे गेली 32 वर्षे तलाठी म्हणून कार्यरत होते. अधिक वर्ष ते साखरपा सजेवर तलाठी म्हणून आपली सेवा बजावली होती. प्रकाश गोयथळे मे 2022 मध्ये आजारी झाले. त्यादरम्यान त्यांना विविध नामांकित हॉस्पिटलमध्ये त्यांचे निदान करण्यात आले .त्यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती व्यवस्थित झाली होती. परंतु गेल्या पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृती मध्ये कोणती सुधारणा न होता ,त्यांचे निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , मुली, दोन जावई ,पुतणे ,असा मोठा परिवार आहे .त्यांची दशक्रिया विधी रविवार दिनांक १ जानेवारी 2023 रोजी गुहागर खालचा पाट येथील स्मशानभूमीत होणार आहे.