गुहागर | प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ रत्नागिरी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विज्ञान रंजन स्पर्धेत गुहागर शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर ची आर्या मंदार गोय थळे हिने प्राथमिक गटातून गुहागर तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. विज्ञान रंजन स्पर्धा ही 4 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात आली होती. पाचवी ते सातवी प्राथमिक गटात८१ विद्यार्थी तर आठवी ते दहावी माध्यमिक गटात९० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये प्राथमिक गटात गुहागर तालुक्यात प्रथम आर्या मंदार गोयथळे (श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर), द्वितीय अनुष्का जाधव( श्रीम. र. पा. पालशेतकर माध्यमिक विद्यालय पालशेत), तृतीय क्रमांक विभागून संस्कृती पाते (सरस्वती विद्या मंदिर जामसुत), समृद्धी सुरेश आंबेकर तृतीय क्रमांक (न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे) ,यांनी यश संपादन केले. तर माध्यमिक गट गुहागर तालुक्यात प्रथम क्रमांक वनु आकिब आदिल, (न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे), द्वितीय वाशिम महंमद सिद्धी घारे( शृंगार तळी उर्दू हायस्कूल), तृतीय पायल मंगेश गमरे (वरदान इंग्लिश स्कूल) यांनी यश संपादन केले आहे. गुहागर तालुक्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शनिवार दिनांक ०९/०१/२०२३ रोजी दुसऱ्या टप्प्याची परीक्षा चिपळूण येथील युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण येथे दुपारी १२ ते १ वाजता होणार आहे. त्यातून जिल्हास्तर प्राथमिक पाच क्रमांक व माध्यमिक पाच क्रमांक काढण्यात येणार आहेत.