आचरा हायस्कूल चा वर्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा उद्या

आचरा | अर्जुन बापर्डेकर :

धी आचरापीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल आचरा या प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी सकाळी ठीक दहा वाजता संस्थेच्या सभागृहात संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप मिराशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरी हक्क संरक्षण संजय डौर हे उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमात सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे