ग्राहक आपल्या हक्कांबाबत जागृत झाला पाहिजे : दादासाहेब गीते

खरेदी विक्री व्यवस्थेतील ग्राहक हा राजा आहे याची फसवणूक होऊ नये म्हणून कायमच यंत्रणेने जागृत राहणे गरजेचे आहे कायद्याने ग्राहकांचे हक्क मिळवून देण्यासाठी यंत्रणा निर्माण केलेली असली तरी ग्राहक प्रशिक्षित होऊन जागृत झाला पाहिजे असे मत जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांनी व्यक्त केले

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राष्ट्रीय ग्राहक दिन देवगड येथे घेण्यात आला यानिमित्त ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला देवगडचे नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर देवगडचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे. एसटीचे विभागीय नियंत्रक प्रशांत वासकर, देवगडचे कृषी अधिकारी कैलास ढेपे,  जिल्हा ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष सुरेश पाटील  तसेच ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन दादासाहेब गीते यांच्या हस्ते करून मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला

सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष प्रा. सुरेश पाटील यांनी आपल्या भाषणात ग्राहकांचे अधिकार , ग्राहकांना न्याय देणारी शासनाची त्रिस्तरीयंत्रणा व स्वयंसेवी संघटना म्हणून काम करणारी ग्राहक पंचायत याबाबत सविस्तर माहिती विशद केली. यावेळी बोलताना ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकांनी जागृत राहिले पाहिजे अवैध व्यापाराच्या विरोधात आम्ही असून ग्राहकांवर होणारा अन्याय आणि सहन करू नये यासाठी ग्राहकांनी उभारण्यात आलेल्या यंत्रणेची मदत घ्यावी असे आवाहनही पाटील यांनी केलेग्राहक जागृतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक पंचायतीतर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्राचे व बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेयावेळी प्रास्ताविक देवगड तहसीलदार मधील अधिकारी प्रदीप कदम यांनी केले प्रदीप कदम यांनी भाषणात ग्राहक कायद्याचा उगम व त्यातील सुधारणा याची माहिती दिली मेळाव्यासाठी बहुसंख्या ग्राहक शासकीय अधिकारी उपस्थित होते