ओटवणे रस्त्यावर ऑईल गळती मुळे अपघात

ग्रामस्थानी माती टाकत रस्ता केला व्यवस्थित

ओटवणे (प्रतिनीधी) ओटवणे मुख्य रस्त्यांवर होणाऱ्या भरमसाठ डंपर वाहतुकीचा फटका वाहन चालकांना बसत असून बुधवारी संध्याकाळी रवळनाथ मंदिर ते कापईवाडी हा २००मीटर पट्टा ऑईल गळती मुळे धोकादायक बनला होता.एका डंपर मधून झालेल्या ऑईल गळती मुळे दू चाकी स्लीप होवून अपघात झाला दुचाकी स्वार किरकोळ जखमी झाला असून थोडक्यांत बचावला ग्रामस्थांनी त्याला नजीकच्या दवाखान्यात नेत मलम पट्टी केली. घडलेल्या घटनेची ग्रामस्थानी ताबडतोब दखल घेत २००मीटर चा ऑईल गळती झालेला भाग माती टाकून सुस्थितीत करत वाहतुकीसाठी व्यवस्थित केला.