गांग्रई येथे आज पुष्कर कृषी पर्यटन केंद्राचे उद‌्घाटन

चिपळूण | वार्ताहर : तालुक्यातील गांग्रई येथे गुरूवार दि. २९ रोजी सायंकाळी ४ ते ८ वाजता पुष्कर कृषी पर्यटन केंद्राचे उद‌्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातून मान्यवर आणि शेतकरी उपस्थित राहणार आहेत.
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांचे सुपुत्र पुष्पर चव्हाण, केतन अनिल चव्हाण, किशोर अनिल चव्हाण व वेदांत संतोष चव्हाण यांच्या माध्यमातून हे कृषी पर्यटन केंद्र सेवेत रुजू होत आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी विविध शिबिरे घेण्याची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर पर्यटकांसाठी खास सुविधा या कृषी पर्यटन केंद्रात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याच पुष्कर कृषी पर्यटन केंद्राचे उद‌्घाटन आज होत आहे. या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी येताना पुष्पगुच्छ ऐवजी एखादं रोप आणल्यास ते नक्कीच स्मरणात राहील, असे आयोजकांनी नमूद केले आहे.