सावंतवाडी | प्रतिनिधी : वेताळ प्रतिष्ठान तुळस,वेंगुर्ले यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत न्यू इग्लिश स्कूल उभादांडा यांनी तुळस येथील जैतीर मंदिर मैदानावर झालेल्या स्पर्धेत विजेतेपद मिळवले.
या स्पर्धेत नामांकित विद्यालयाचे संघ सहभागी झाले होते. या जिल्हा स्तरीय स्पर्धेत सहभागी झालेले न्यू इग्लिश स्कूल च्या संघाने उत्कृष्ट कामगिरीचे सातत्यपूर्ण दर्शन घडवत आणि विजेतेपदाला मान मिळवत रसिक प्रेषकांची मने जिंकली.
या संघात रमाकांत बागायतकर याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या संघात प्रथमेश भोकरे, प्रशांत शिरगांवकर,बाबल माडकर,यश आरावंदेकर, सर्वेश नवार,आनंद कारेकर अमेय डिचोलकर,प्रतिक तांडेल,तन्मय खवणेकर भुपेश वराडकर हे खेळाडू सहभागी झाले होते या विजेत्या संघाला प्रशिक्षक म्हणुन खानोली गावचे सुपुत्र आणि उत्कृष्ट खेळाडू म्हणुन लौकिक असलेले श्री संदेश खानोलकर यांनी विशेष मार्गदर्शन केले त्याच बरोबर या विजेत्या संघाला अजित केरकर ,प्रा.वैभव खानोलकर यांचे ही मार्गदर्शन लाभले. या बरोबरच पालक सद्गुरू तांडेल,आणि दिलीप गोठसकर यांनीही विशेष सहकार्य केले. या रस्सीखेच विजेत्या संघाला वेताळ प्रतिष्ठाकडून आकर्षक सन्मान चिन्ह देऊन गौरवले गेले असुन वेंगुर्ले वासियांकडून या यशासाठी विशेष अभिनंदन होत आहे उभादांडा न्यु इग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री.उमेश वाळवेकर सर आणि संस्था अध्यक्ष श्री.विंरेद्र कामत आडारकर ,सचिव श्री रमेश नरसुले आदी पदाधीका-यानी या विजेत्या संघातील सर्व खेळाडू आणि त्याचे सर्व मार्गदर्शन यांचे ही अभिनंदन केले आहे.
Home सिंधुदुर्ग सावंतवाडी जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत वेंगुर्ले न्यू इग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाचे यश