तत्कालीन सरपंच विनोद राऊळ यांच्या पाठपुराव्याला यश
सावंतवाडी । प्रतिनिधी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नेमळे गावातील पाटकरवाडी ते फौजदारवाडी व हरिजनवाडी ते एरंडवाकवाडी या रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नेमळे गावचे तत्कालीन सरपंच विनोद राऊळ यांनी या कामांसाठी पाठपुरावा केला होता त्याला यश आले असून दोन्ही रस्ते मंजूर झाले आहेत.दरम्यान, सदरच्या रस्त्यांसाठी ८ ते ९ मीटर रूंदीच्या जागेची आवश्यकता भासणार आहे. याबाबत प्राधनमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था उप अभियंता यांनी सरपंच विनोद राऊळ या़ंना जमिन मालकांकडून जागा व ग्रामपंचायत ठराव उपलब्ध करून देण्यासाठीच पत्र दिले आहे.
विनोद राऊळ सरपंच असताना त्यांच्या कार्यकाळात त्यांनी या रस्त्यांसाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हे काम मार्गी लागलं आहे.नेमळे गाव भौगोलिक दृष्ट्या मोठा गाव असून या गावातील अनेक अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. त्यामूळे आगामी काळातही सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून या रस्त्यांची कामे पूर्ण केली जातील. तसेच ग्रामपंचायतवरील सत्ता गेली असली तरीही नियोजित सर्व विकासकामे पूर्ण केली जातील, असा विश्वास विनोद राऊळ यांनी प्रहारशी बोलताना व्यक्त केला.